Also visit www.atgnews.com
ICSE आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा ५ मे पासून
ICSE Board 10th 12th Time-Table 2021: काउन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेस एक्झामिनेशन (CISCE) ने इयत्ता दहावी (ICSE) आणि बारावी (ISC) परीक्षा २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयसीएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर cisce.org वर दोन्ही इयत्तांचे तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आयसीएसई क्लास 12 (ISC ) आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या म्हणजेच आयएससी बोर्ड परीक्षा ८ एप्रिल २०२१ पासून सुरू होणार आहेत. मुख्य थिअरी परीक्षा ५ मे २०२१ पासून सुरू होतील. तत्पूर्वी ८ एप्रिलला कॉम्प्युटर सायन्स पेपर - २ चे प्रॅक्टिकल-प्लानिंग सेशन असेल आणि ९ एप्रिल रोजी होम सायन्स आणि इंडियन म्युझिक पेपर - २ चे प्रॅक्टिकल्स होतील. ५ मे रोजी बिझनेस स्टडीज विषयाच्या पेपरसह ही परीक्षा सुरू होईल. बहुतांश पेपर दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळात होणार आहेत. काही पेपर्सची परीक्षा सकाळी ९ वाजल्यापासून असेल. आयसीएसई क्लास 10 (ISCE time table 2021) आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षा ५ मे पासून सुरू होणार आहेत. पहिल्या दिवशी इंग्रजी भाषा पेपर १ ची परीक्षा असेल. यासाठी २ तासांचे वेळ असेल. दहावीचे बहुतांश पेपर सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होतील. काही पेपरची परीक्षा सकाळी ९ पासून सुरू होईल. परीक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल. विद्यार्थी या वेळेत प्रश्नपत्रिकेचे आकलन करू शकतात. उत्तरे लिहिण्याची सुरुवात परीक्षेच्या वेळेत होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r7YPjB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments