NEET 2021 चा पेपर पॅटर्नमध्ये बदलणार का? परीक्षा कधी? सरकारने दिली माहिती...

NEET-UG 2021: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी देशपातळीवर होणारी प्रवेश परीक्षा नॅशनल एलिजीबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) मध्ये यावर्षी कोणताही बदल होणार नाही. परीक्षेचा पेपर पॅटर्न मागील वर्षीप्रमाणेच राहणार आहे. नीट परीक्षा जून-जुलै दरम्यान पेन-पेपर वर आधारित होणार आहे. उच्च शिक्षण सचिव अमित खरे यांनी माहिती दिली की अशा पद्धतीने खूप कमी वेळ शिल्लक असताना परीक्षेत बदल करणे योग्य होणार नाही आणि परीक्षा आयोजित करण्यास विलंब झाला तर नव्या सत्रावर त्याचा परिणाम होईल. शिक्षण मंत्रालयाला ही परीक्षा वर्षातून एक वेळा आणि संगणक आधारित व्हायला हवी होती, मात्र आरोग्य मंत्रालयासोबत याबाबत सहमती झाली नाही. जेईई मेन परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित केली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. गेल्या वर्षीही जेईई मेन दोन वेळा झाली होती आणि २८ टक्के विद्यार्थ्यांनी आपला स्कोअर दुसऱ्या प्रयत्नात सुधारला होता. त्यामुळे नीट परीक्षा देखील जास्त वेळा व्हावी अशी मागणी होत होती. खरे म्हणाले की, 'नीट परीक्षा देखील वर्षात अनेकदा आयोजित व्हावी असे आम्हाला वाटते. कारण अनेकदा उमेदवार कुठल्या ना कुठल्या कारणाने परीक्षेत लक्ष केंद्रित करू शकला नाही, तर त्याचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती असते. पण जर एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा घ्यायची असेल तर ती संगणकीकृत व्हायला हवी.' याशिवाय जेईई आणि नीट परीक्षेच्या स्वरुपात फरक आहे, त्यामुळे संबंधित घटकांशी चर्चा करूनच नीट संदर्भात बहुपरीक्षांबाबत विचार होऊ शकतो. जेईई ही अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशांसाठी अनिवार्य नाही, मात्र नीट ही वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठी अनिवार्य आहे. शिवाय समजा एखाद्या बायोलॉजीच्या विद्यार्थ्याला संगणीकृत परीक्षा सोयीची वाटली नाही तर त्यांना कॉम्प्युटरवर खूप सराव करावा लागेल. अशा अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागणार असल्याने कोणताही बदल करायचा असेल तर किमान सहा ते आठ महिन्यांचा अवधी हवा, असे खरे यांनी सांगितले. नीट यूजी यंदा कधी होणार तेही लवकरच जाहीर होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kCF01b
via IFTTT

Post a Comment

0 Comments