Also visit www.atgnews.com
JEE Main फेब्रुवारी सत्र परीक्षेची आन्सर-की जारी
JEE Main Answer key 2021: जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम मेनच्या (JEE Main) फेब्रुवारी २०२१ सत्राच्या परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key) जाहीर झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अधिकृत संकेतस्थळावर ही उत्तरतालिका जारी केली आहे. jeemain.nta.nic.in वर जाऊन उमेदवारांना ही आन्सर की पाहता येईल. जेईई मेन २०२१ परीक्षेचं पहिलं सत्र २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पार पडलं. देशभरात अनेक परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशा दोन सत्रात ही परीक्षा पार पडली. ज्या उमेदवारांनी फेब्रुवारी सत्राची जेईई मेन परीक्षा दिली आहे ते उत्तरतालिका अधिकृत संकेतस्थळावरून किंवा या वृत्तात पुढे दिलेल्या थेट लिंकवरून पाहू आणि तपासू शकतात. उत्तरतालिकेसाठी उमेदवारांना त्यांचा जेईई रोल नंबर आणि जन्मतारीख आदी माहिती देऊन लॉगइन करावे लागेल. जे उमेदवार आन्सर कीने समाधानी नाहीत, ते आपल्या हरकती नोंदवू शकतात. प्रति प्रश्न २०० रुपये इतके शुल्क यासाठी आकारले जाईल आणि ते नॉन रिफंडेबल असेल. हरकती नोंदवण्यासाठी १ मार्च २०२१ ते ३ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. योग्य आधार वा पुरावा नसलेल्या हरकती वा आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केले आहे. आक्षेपांवरील नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा निर्णय कायम राहील. विषयतज्ज्ञ आलेल्या हरकतींची तपासणी करतील आणि त्यानंतर ची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ObqbGM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments