JEE Main 2021 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; परीक्षा कधी? वाचा

JEE Main 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) फेब्रुवारी सत्राच्या जेईई मेन २०२१ परीक्षेची उत्तरतालिका तसेच जेईई मेन मार्च 2021 () सत्रासाठीचे अर्ज जारी केले आहेत. जेईई मेन 2021 मार्च सत्रासाठीचे अर्ज jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. मार्चच्या सत्रासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च आहे. जेईई मेन मार्चसाठी अर्ज शुल्क ६५० रुपये आहे तर महिला / अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडीसाठी ३२५ रुपये आहे. विद्यार्थी जर जेईई परीक्षा पहिल्यांदा देत असतील तर नवीन नोंदणी करू शकतात किंवा आधीच नोंदणीकृत उमेदवार मार्चच्या सत्रासाठी अर्ज करू शकतात. जेईई मेनचे दुसरे सत्र १५ ते १८ मार्च दरम्यान होईल. अर्ज कसा करावा? - प्रथम jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा. - यानंतर आपले नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ता आदि माहिती देऊन नोंदणी करा. - आता जेईई मेनचा अर्ज भरा. - फोटो आणि स्वाक्षरीची स्कॅन कॉपी अपलोड करा. - आता जेईई अर्ज शुल्क भरा. - कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा. मार्चच्या सत्राची परीक्षा कधी होईल? जेईई मुख्य मार्च सत्राची परीक्षा १५, १६, १७ आणि १८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2PhLIxY
via IFTTT

Post a Comment

0 Comments