Also visit www.atgnews.com
BHEL Jobs 2021: अप्रेंटिस पदांवर नोकऱ्या, दहावी उत्तीर्णांपासून इंजिनीअर्सना संधी
BHEL Apprentice Recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने अप्रेंटिसच्या अनेक पदांवर भरती सुरू केली आहे. दहावीनंतर आयटीआय कोर्स करणाऱ्यांपासून (ITI Level Jobs) इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा आणि बीई (BE) व बीटेक (BTech) करणाऱ्यांपर्यंतच्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची (Govt Jobs) संधी आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. अधिक माहिती पुढे देण्यात आली आहे. कोणती पदे रिक्त? ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) - २५३ पदे टेक्नीशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) - ७० पदे ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) - ६६ पद एकूण पदे - ३८९ पात्रतेचे निकष ट्रेड अप्रेंटिस - दहावीनंतर संबंधित ट्रेड मध्ये SCVT किंवा NCVT च्या मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय कोर्स (ITI Course) केला असणे अनिवार्य. टेक्नीशियन अप्रेंटिस - संबंधित शाखेतील इंजिनीअरिंग डिप्लोमा. ग्रॅज्युएट अप्रेंटिस - संबंधित शाखेतली बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग (BE) किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (BTech) पदवी. अर्ज प्रक्रिया इच्छुक उमेदवारांना बीएचईएल तिरुचिरापल्ली (BHEL Trichy) च्या वेबसाइद्वारे (trichy.bhel.com) ऑनलाइन अर्ज करायचा आहे. मात्र तत्पू्र्वी उमेदवाराना नॅशनल अप्रेंटिसशिप पोर्टल (National Apprenticeship Portal) वर रजिस्टर करावे लागेल. अर्ज सुरू होण्याची तारीख - १ एप्रिल २०२१ अर्ज करण्याची अंतिम तारीख - १४ एप्रिल २०२१ अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची तारीख - १६ एप्रिल २०२१ डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशनची तारीख - २१ एप्रिल २०२१ वयोमर्यादा सर्व पदांसाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २७ वर्षे. वयाची गणना १० एप्रिल २०२१ पर्यंत केली जाईल. आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत नियमानुसार सवलतीचा लाभ मिळेल. निवड प्रक्रिया बीएचईएल त्रिचीच्या या पदांवर नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिटच्या आधारे थेट भरती होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cM6TBB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments