करोनामुळे विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य कलचाचणीचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता श्यामची आई फाउंडेशन आणि सिखलो डॉट कॉम यांच्या वतीने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाइन कलचाचणीचे आयोजन केले आहे. इयत्ता अकरावीत कोणती शाखा निवडावी; तसेच भविष्यात कोणते विद्यार्थ्यासाठी उत्तम ठरू शकते, अशा विविध प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना कलचाचणीतून मिळवता येतील. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाली असून, विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक संभ्रमावस्थेत आहे. अशा परिस्थितीत पाल्याला आवडणारा अभ्यासक्रम कोणता, त्याने उच्च शिक्षणासाठी कोणती शाखा निवडावी असे प्रश्न पालकांसमोर आहेत. त्याचप्रमाणे करिअरच्या दृष्टीने नेमके कोणत्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घ्यावे, असाही प्रश्न विद्यार्थी-पालकांसमोर उपस्थित झाला आहे. या सर्वांवर उपाय म्हणून श्यामची आई फाउंडेशन आणि सिखलो वेबसाइटच्या वतीने विनामूल्य ऑनलाइन कलचाचणीचे आयोजन केले आहे. ही आठवी ते दहावी; तसेच अकरावी आणि बारावी अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्याच्या सोयीनुसार मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषेत कलचाचणी देता येईल. त्याचप्रमाणे कलचाचणीचा निकाल तत्काळ माहिती होणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने होईल. कलचाचणी देण्यासाठी पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी श्यामची आई फाउंडेशन आणि सिखलो डॉट कॉम या दोन्हींच्या वेबसाइटवर भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ई-मेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tXPMTJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments