Also visit www.atgnews.com
दहावी परीक्षेचे शुल्क परत करा; विद्यार्थी संघटनांची मागणी
म.टा.प्रतिनिधी, नागपूर दहावीची परीक्षा रद्द झाली असल्यामुळे राज्य मंडळाचा बराचसा खर्च वाचला आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क त्यांना परत करण्यात यावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. करोनास्थितीमुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन साहाय्याने त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी निकष ठरविण्याची कार्यपद्धती ठरविण्यात येते आहे. यंदा लेखी परीक्षा होणार नसून पर्यवेक्षकांचे मानधन, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अतिरिक्त साहित्य, भरारी पथकाचा खर्च, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मुद्रण यांचा कोणताही खर्च राज्य शिक्षण मंडळाला येणार नाही. यंदा संपूर्ण राज्यभरात सुमारे १६ लाख २०६ विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून राज्य शिक्षण मंडळ ४१५ रुपये परीक्षा शुल्क घेतले. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना ३९५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागते. नियमित विद्यार्थ्यांचे मंडळाकडे ६६ कोटी ४० लाख ८५ हजार रुपये शुल्क यंदा जमा झाले आहे. यामध्ये पुनर्परीक्षार्थ्यांचे मिळून सुमारे ७० कोटी परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा झाले आहे. राज्यात ज्या तालुक्यात दुष्काळ आणि इतर नैसर्गिक संकटे आली, तेथील विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून शासनाकडून परीक्षा शुल्क माफी मिळते. या आधी मागील तीन वर्षापासून या शुल्कमाफीची रक्कम विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून परत मिळाली नव्हती. यंदाच्या फेब्रुवारीत राज्यातील दहावी, बारावीच्या तब्बल ८ लाख विद्यार्थ्यांना थकित असलेल्या २१ कोटी २६ लाखांचे शुल्क परत मिळेल असे मंडळाने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळातील आर्थिक परिस्थिती आणि परीक्षा रद्दचा निर्णय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकडून घेतलेले दहावी परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना शाळांच्या माध्यमातून तात्काळ परत करावे अशी मागणी सुरू झाली आहे. कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2S43o1D
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments