'त्या' अभ्यासक्रमांना बीएस्सी ॲग्रीची समकक्षता

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमांना बीएस्सी ॲग्री (ऑनर्स) या पदवी अभ्यासक्रमाच्या समकक्षतेचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे कृषी शाखेत विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी आणि पदभरतीच्या विविध परीक्षा देण्यासाठी अडचण येणार नाही. सरकारच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी निर्णय प्रसिद्ध केला आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्यामार्फत कृषी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमांमध्ये बीएस्सी उद्यानविद्या, बीएस्सी वनविद्या, बीएस्सी सामाजिक विज्ञान, बीएफएस्सी (मत्स्य विज्ञान), बीटेक (कृषी अभियांत्रिकी), बीटेक (अन्नतंत्रज्ञान), बीटेक (जैवतंत्रज्ञान), बीएस्सी (एबीएम), बीबीएम (कृषी), बीबीए (कृषी), बीएस्सी (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) यांचा समावेश आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gvf7jY
via IFTTT

Post a Comment

0 Comments