५४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणच वाटतंय सोयीचं

म. टा. प्रतिनिधी, पुणे सुमारे ५४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांना पद्धती सोयीस्कर वाटत असल्याचे नव्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतातील शिक्षण आणि शिकण्याची पद्धती कशी बदलत गेली हे समजून घेण्याच्या उद्दिष्टाने हे सर्वेक्षण करण्यात आले. ब्रेनली या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने 'लॉकडाउन अँड लर्न-फ्रॉम-होम मॉडेल' शीर्षकाअंतर्गत हे नवीन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात दोन हजार ३७१ विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वेक्षणातील सुमारे ५४ टक्के विद्यार्थ्यांनी आता ऑनलाइन शिक्षण पद्धती सोयीस्कर असल्याचे सांगितले. शाळा पुन्हा सुरू झाल्यावर कोणत्या शिक्षण पद्धतीला पसंती द्याल, असे विचारले असता विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिले. सर्वेक्षणातील निम्म्यापेक्षा जास्त सहभागींनी संमिश्र शिक्षण पद्धतीला पसंती दिली. गेल्या वर्षी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या साह्याने विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणासाठी काही प्रमाणात शाळेतील शिक्षक आणि पालकांची मदत घेतली. करोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने सध्या पु्न्हा शाळेत जाण्यास विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे. 'साधारण ५४ टक्के विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीत ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यास पसंती दर्शवली. शिक्षणाच्या इतिहासात यापूर्वी ऑनलाइन लर्निंग चॅनलचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर वापर कधीही झाला नव्हता. आता बहुतांश विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शिक्षणासाठीची ऑनलाइन साधने कशी वापरायची ते समजले आहे. त्यामुळे संमिश्र शिक्षण पद्धती ही या उद्योगाच्या प्रगतीचा मार्ग असेल,' असे ब्रेनलीचे अधिकारी राजेश बिसाणी यांनी सांगितले. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aELcSE
via IFTTT

Post a Comment

0 Comments