Also visit www.atgnews.com
'परीक्षा रद्द'चा फेरविचार करावा; शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने () फेरविचार करावा, अशी मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून, त्यांना उत्तीर्ण करणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी, शिक्षणव्यवस्थेसाठी आणि समाजासाठी घातक असल्याचा मुद्दा अभ्यासक धनंजय कुलकर्णी यांनी मांडला आहे. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी सदस्य आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कुलकर्णी यांच्या बाजूने निकाल देऊन परीक्षा घेण्याचा आदेश दिला होता. आता कुलकर्णी आणि जुन्या कार्यकर्त्यांनी 'सीबीएसई'ने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बदलावा, अशी मागणी केली आहे. 'विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून, त्यांना एकप्रकारे शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत करण्यासारखे आहे. परीक्षा रद्द करून, त्यांना थेट भविष्यातील स्पर्धेसाठी पुढे ढकलणे चुकीचे आहे,' असे कुलकर्णी यांनी सांगितले. करोनामुळे अनेक ठिकाणी वर्षभर शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कशाच्या आधारावर पूर्ण झाले, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या मूल्यमापनावर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्य ठरणार नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 'परिस्थिती आटोक्यात आल्यावर परीक्षा घ्या' ''सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनावर आधारित निकाल मान्य नसल्यास, ते पुन्हा परीक्षा देऊ शकतात, असे जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ठरावीक विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यापेक्षा सर्वांची परीक्षा होऊ शकते. करोनासंसर्ग कमी असणाऱ्या राज्यांत परीक्षा होऊ शकते, तर इतर राज्यात परिस्थिती निवळल्यावर परीक्षा होऊ शकतात,' असे म्हणणे धनंजय कुलकर्णी यांनी डॉ. निशंक यांच्याकडे पत्राद्वारे मांडले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tqJ3S1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments