पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील विद्यापीठात काँग्रेसची सरशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने विद्यार्थी निवडणुकांमध्ये बाजी मारली आहे. एनएसयूआयने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचा विद्यार्थी कृष्ण मोहन शुक्ला याची विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अजित कुमार चौबे उपाध्यक्ष, शिवम चौबे सहसचिव आणि आशुतोष कुमार मिश्रा याची ग्रंथालय मंत्री म्हणून निवड झाली आहे. रविवारी सायंकाळी हे निकाल जाहीर करण्यात आले. तरुणांना बदल हवा आहे म्हणूनच त्यांनी भाजपला नमवत काँग्रेस उमेदवारांना आपला कौल दिला, अशी माहिती जिल्हा युथ काँग्रेस अध्यक्ष विश्वनाथ कुँवर यांनी दिली. 'ही उत्तर प्रदेशमधील बदलाची नांदी आहे,' अस राज्य काँग्रेस प्रमुख अजय कुमार लल्लू म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uIqlFx
via IFTTT

Post a Comment

0 Comments