CA Foundation Exam 2021 अर्ज भरताना काही नियमांमध्ये सवलत

CA Foundation Exam 2021: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सीए फाउंडेशन परीक्षेसाठी अर्ज भरण्यासंदर्भात आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. सीए फाउंडेशन या जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासंबंधीचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत. हे परिपत्रक icai.org या संकेतस्थळावर पाहू शकता. आयसीएआयने सीए फाउंडेशन कोर्स परीक्षांसाठी ऑनलाइन फॉर्म भरताना आवश्यक असलेले बारावी परीक्षेचे अॅडमिट कार्ड अपलोड करण्याचा नियम शिथील केला आहे. तसेच अॅप्लीकेशन/डिक्लेयरेशन फॉर्म अटेस्ट करण्याच्या अनिवार्यतेतूनही सवलत देण्यात आली आहे. आयसीएआयने या परिपत्रकात असे म्हटले आहे की कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक मोठ्या शिक्षण मंडळांनी बोर्ड परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड जारी केलेले नाही. त्यामुळे उमेदवार परिस्थिती सामान्य झाल्यानंतर अॅडमिट कार्ड आयसीएआयच्यचा पत्त्यावर (ICAI Bhawan, C-1, Sector-1 Noida 201301) वर पाठवू शकतात किंवा foundation_examhelpline@icai.in या ईमेल आयडी वर मेल देखील करू शकतात. आयसीएआयने विद्यार्थ्यांना सीए मेंबर/गॅझेटेड ऑफिसर/शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्याद्वारे आपला परीक्षा अर्ज अटेस्ट करण्यापासून देखील सवलत दिली आहे. जर एखाद्या उमेदवाराची स्वाक्षरी किंवा फोटो सिस्टीम तर तो आपल्या जून फाउंडेशन एक्झामिनेशन फॉर्मसोबत आपलं आधार कार्ड अपलोड करू शकतो. अशा विद्यार्थ्यांनी परिस्थिती सामान्य झाल्यावर आपले डिक्लेरेशन सीए मेंबर/गॅझेटेड ऑफिसर/शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्याद्वारे सांक्षांकित करून संस्थेच्या पत्त्यावर पाठवावे. किंवा foundation_examhelpline@icai.in या ईमेल आयडी वर मेल करावे. अर्ज प्रक्रिया २० एप्रिल पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ४ मे पर्यंत सुरू राहणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ मे २०२१ आहे. परीक्षा २४ ते ३० जून २०२१ या कालावधीत होणार आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tXuXYm
via IFTTT

Post a Comment

0 Comments