Govt Jobs: फ्रेट कोरिडोरसाठी १,०७४ जागांवर भरती, वेतनश्रेणी १.६० लाखांपर्यंत

Sarkari Job Vacancy 2021: भारत सरकारने () साठी भरती सुरू केली आहे. दहावीनंतर आयटीआय करणाऱ्यांपासून ग्रॅज्युएट ते इंजिनीअर्सपर्यंत सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी विविध पदांवर नोकरीची संधी आहे. या भरतीचे डिटेल्स पुढे देण्यात येत आहेत. ही भरती डेडिकेटेड फ्रेट कोरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड () मध्ये होत आहे. ऑफिशियल जॉब नोटिफिकेशन आणि अॅप्लिकेशन फॉर्मपर्यंत सर्व लिंक्सही या वृत्तात पुढे देण्यात येत आहेत. पदांची माहिती ज्युनियर मॅनेजर (सिविल) - ३१ पदे ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशंस अँड बीडी) - ७७ पदे ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) - ३ पदे एक्झिक्युटिव (सिविल) - ७३ पदे एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - ४२ पदे एक्झिक्युटिव (सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन) - ८७ पदे एक्झिक्युटिव (ऑपरेशंस अँड बीडी) - २३७ पदे एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - ३ पदे ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - १३५ पदे ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन) - १४७ पदे ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशंस अँड बीडी) - २२५ पदे ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - १४ पदे एकूण पदे - १०४७ पदांनुसार वेतनश्रेणी ज्युनियर मॅनेजर - ५० हजार ते १.६० लाख रुपये मासिक एक्झिक्युटिव - ३० हजार से लेकर १.२० लाख रुपये मासिक ज्युनियर एक्झिक्युटिव - २५ हजार से लेकर ६८ हजार रुपये मासिक हे बेसिक वेतन आहे. याव्यतिरिक्त अन्य भत्तेही लागू असतील. शैक्षणिक पात्रता पदांनुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करून मिळेल. दहावी उत्तीर्ण ते आयटीआय करणारे तसेच संबंधित ट्रेडचा डिप्लोमा, पदवी, एमबीए किंवा पीजीडीएम आणि इंजिनीअरिंग अशी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. अर्ज कसा करायचा? या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी तुम्हाला DFCCIL ची वेबसाइट dfccil.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया २४ एप्रिल पासून सुरू झाली आहे. २३ मे २०२१ पर्यंत अर्जांची मुदत आहे. ज्युनियर मॅनेजर पदासाठी अर्ज शुल्क १,००० रुपये, एक्झिक्युटिवसाठी ९०० रुपये आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव पदासाठी अर्ज शुल्क ७०० रुपये आहे. सामान्य, ओबीसी एनसीएल आणि आर्थिक दुर्बल गटासाठी अर्ज शुल्क असेल. एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया नि:शुल्क आहे. निवड प्रक्रिया संगणक आधारित परीक्षेच्या आधारे निवड होईल. ज्युनियर मॅनेजर पदांसाठी सीबीटीनंतर मुलाखतींची फेरीदेखील होईल. DFCCIL vacancy notification 2021 साठी येथे क्लिक करा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. DFCCIL च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vjCYaj
via IFTTT

Post a Comment

0 Comments