Also visit www.atgnews.com
JEE Advanced 2021: जेईई अॅडवान्स्डची तारीख बदलणार?
IIT exam 2021: आयआयटीत अॅडमिशनसाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन अॅडव्हान्स्ड () चे आयोजन यंदा ३ जुलै रोजी होणार आहे. पण या तारखेत कदाचित बदल होऊ शकतो. आयआयटी खडगपूर () ने याचे संकेत दिले आहे. सध्या कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, त्या पार्श्वभूमीवर परीक्षेसंबंधी हजारो विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स आणि ई-मेल्स आल्यामुळे आयआयटी खडगपूरच्या जेईई अॅडव्हान्स्ड कमिटीने मंगळवार २७ एप्रिल २०२१ रोजी बैठकीचे आयोजन केले होते. यात परीक्षेच्या तारखेवर चर्चा केली गेली. या बैठकीत सहभागी तीन सदस्यांच्या समितीने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षेची तारीख बदलण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. आयआयटी जेईई अॅडव्हान्स्डचे अध्यक्ष देबाशीष चक्रवर्ती यांनी म्हटले आहे की, 'ज्या प्रकारची करोनाची स्थिती आहे, ती पाहता आम्ही जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ ची नियोजित ३ जुलै ही तारीख बदलू शकतो. कारण जेईई मेन्स आणि अॅडव्हान्स्ड यांच्यात गॅप असणे देखील जरुरी आहे.' कोविड-१९ (Covid-19) मुळे जेईई मेन एप्रिल २०२१ (JEE Main April 2021) परीक्षा लांबणीवर पडली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्नेसी (NTA) तूर्त या परीक्षेच्या आयोजनासंबंधी निश्चित तारीख कळवलेली नाही. जोपर्यंत जेईई मेन एप्रिल परीक्षा होत नाही, तोपर्यंत मे परीक्षा देखील होणार नाही. जेईई मेन (JEE Main) च्या चारही परीक्षांच्या आणि निकालाच्या नंतरच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन होऊ शकते. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nqn7UQ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments