Also visit www.atgnews.com
UPSC NDA Exam येत्या रविवारी; करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी
UPSC NDA Exam 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा १ चे आयोजन देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात आले आहे. येत्या रविवारी १८ एप्रिल २०२१ रोजी ही परीक्षा होणार आहे. आयोगाद्वारे परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारंसाठी ई प्रवेश पत्रही २६ मार्चपासून जारी करण्यात आले आहेत. रविवार, १८ एप्रिल २०२१ रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (१) २०२१ चे आयोजन देशभरातील निर्धारित परीक्षा केंद्रांवर करण्यात येणार आहे. दुसरीकडे, संपूर्ण देशात वाढत असलेल्या करोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. परीक्षा देणारे उमेदवार ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पंतप्रधान कार्यालयाकडे या उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली आहे. देशातील अनेक शिक्षण मंडळांनी परीक्षा, स्पर्धा परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत किंवा रद्द तरी केल्या आहेत, अशा वेळेत ही परीक्षा स्थगित करावी, अशी उमेदवारांची मागणी आहे. परीक्षा केंद्रे राहत्या घरापासून खूप दूर आहे आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तेथे पोहोचणे कठीण असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. दरम्यान, राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (१) २०२१ चे प्रवेश पत्र २६ मार्च पासून जारी करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी अद्याप हे प्रवेशपत्र डाऊनलोड केलेले नाही, त्यांनी upsconline.nic.in या यूपीएससीच्या अधिकृत पोर्टलवरून आजच हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे, कारण अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. यूपीएससीने एनडीए परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी कोविड-१९ संबंधी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे अॅडमिट कार्डवर देण्यात आली आहेत. त्यांचे पालन करणे सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ag3ERv
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments