सारस्वत बँक ज्युनिअर ऑफिसर पदांच्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर

Junior Officer Result 2021: सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने ज्युनिअर ऑफिसर पदांच्या भरती परीक्षेचा निकाल जारी केला आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर झाला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते saraswatbank.com या संकेतस्थळावरून निकाल पाहू आणि डाऊनलोड करू शकतील. सारस्वत बँकेने ३ एप्रिल २०२१ रोजी विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली होती. एकूण ९,३७८ उमेदवारांनी परीक्षा दिली, त्यापैकी ४४३ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. उमेदवार त्यांचा निकाल अधिकृत संकेतस्थळावरून मिळेल किंवा या वृत्तात दिलेल्या थेट लिंकवरूनही पाहता येईल. Saraswat Bank Junior Officer Result 2021 कसा पाहाल? उमेदवार पुढील पद्धतीने त्यांचा Saraswat Bank Junior Officer Result 2021 पाहू शकतात आणि डाऊनलोडदेखील करू शकतात - १) सारस्वत को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला - saraswatbank.com भेट द्या. २) होमपेजवर करिअर टॅबवर क्लिक करा आणि 'List of Candidates Shortlisted for Interview - Click Here' या पर्यायावर क्लिक करा. ३) आता तुम्ही एका नव्या पेजवर जाल. ४) तुमचा Saraswat Bank Junior Officer Result 2021 निकाल स्क्रीनवर दिसू लागेल. ५) डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33I1Ixc
via IFTTT

Post a Comment

0 Comments