UPSC Prelims 2021: यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर

Exam 2021 Postponed: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ ची तारीख बदलली आहे. यापूर्वी ही पूर्व परीक्षआ २७ जून २०२१ रोजी होणार होती. पण ती आता लांबणीवर टाकण्यात आली आहे. नव्या तारखेची घोषणाही केली आहे. आयोगाने आपली अधिकृत वेबसाइट वर यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. यूपीएससीने कळवले आहे की कोविड-१९ महामारीच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. गेल्या वर्षी देखील करोनामुळे आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० स्थगित केली होती. त्यावेळीदेखील ही परीक्षा ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आली होती. जून २०२० ऐवजी ४ ऑक्टोबर २०२० रोजी ही पूर्व परीक्षा देशभरात विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली. UPSC Helpline number: या परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी यूपीएससीशी पुढील क्रमांकांवर कार्यालयीन दिवसांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क करता येणार आहे - ०११-२३३८५२७१, ०११-२३३८११२५, ०११-२३०९८५४३ यावेळी यूपीएससीने सिव्हिल सेवा परीक्षा २०२१ (UPSC Civil Services 2021) चे नोटिफिकेशन देखील उशिराने जारी केले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ogDe7Y
via IFTTT

Post a Comment

0 Comments