अकरावी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असावी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दहावीच्या मूल्यांकनाबाबत अद्याप अंतिम निर्णय अद्याप होत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा ताण अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांवर येत आहे. या सर्वांतून विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी शाळांशी जोडलेल्या ज्युनिअर कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुभा देण्यात यावी, तसेच ज्या विद्यार्थ्यांना इतर कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना ऐच्छिक प्रवेशपरीक्षा ठेवावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे, याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल लागून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार, या सर्वात भरपूर कालावधी जाणार. याचबरोबर अकरावीसाठी प्रवेश परीक्षेचाही विचार होत आहे. ही परीक्षा घ्यायची असेल, तर विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार नवीनच असणार आहे. यामुळे त्यांना किमान दीड महिन्यांचा अवधी, प्रश्नसंच, सराव परीक्षा आदी होणेही आवश्यक आहे. या सर्वांत वेळ खर्च होणार आहे. यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊ ज्या शाळांना ज्युनिअर कॉलेज जोडलेले आहे, अशा शाळांमध्ये सुमारे चार ते पाच लाख विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेतील ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यास मुभा द्यावी, अशी सूचना मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केली आहे. यावर्षी परीक्षा रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसा द्यायचा हा प्रश्न आहे. यासाठी शाळांमध्ये आतापर्यंत झालेल्या परीक्षांच्या आधारे ज्युनिअर कॉलेजांत प्रवेश घेऊ शकतात. ज्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज जोडलेले नाही तेथील विद्यार्थी नजिकच्या ज्युनिअी कॉलेजांत जाऊन प्रवेश घेऊ शकतील. यासाठी अंतर्गत कोट्यातील जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी सूचनाही या पत्रात करण्यात आली आहे. ज्या माध्यमिक शाळांमध्ये अकरावीचे वर्ग नव्याने सुरू करण्याइतकी भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे. त्यांना प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षाची हंगामी परवानगी दिल्यास प्रवेश समस्या सोडविण्यास अधक मदत होईल, असेही यात नमूद केले आहे. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सिनिअर कॉलेजशी जोडलेल्या ज्युनिअर कॉलेजमध्ये अथवा अन्य शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांची शाखानिहाय विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घ्यावी. ही परीक्षा सामायिक असेल आणि फक्त ज्या महानगरात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होते, तेथेच ती होईल. याने अनेक प्रश्न सुटू शकतील, अशी सूचनाही या पत्रात करण्यात आली आहे. कायमस्वरूपी तोडगा हवा संघाचे समन्वयक सुशील शेजुळे आणि संस्थापक सदस्य व मार्गदर्शक सुरेद्र दिघे यांनी लिहलेल्या या पत्रात यंदाचा अकरावी प्रवेशाचे गणित सोडविण्यासाठी चर्चा, राजकीय इच्छाशक्ती अणि न्यायालय या थांब्यांवर थांबत यथावकाश नक्की सुटेल. मात्र हा प्रश्न कायमचा सोडवायचा असल्यास बुद्धिनिष्ठ व तर्कशास्त्र यावर आधारित कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे. नवीन शिक्षण धोरणाच्या आधारे उच्च माध्यमिक वर्ग, माध्यमिक शाळांशी कालांतराने जोडून घेणे हाच तो कठोर निर्णय असणार आहे. सोबतच हे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी नियोज करण्याची विनंतीही या पत्रात केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vmDKnn
via IFTTT

Post a Comment

0 Comments