Also visit www.atgnews.com
मिलीटरी कॉलेजची प्रवेश परीक्षा स्थगित
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश पात्रता परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा पाच जूनला होणार होती. परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठीच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. लष्करी प्रशिक्षणाची ओळख व्हावी, यासाठी नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इयत्ता सातवीत शिकत असलेल्या किंवा सातवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश घेता येतो. त्यासाठी यंदा पात्रता प्रवेश परीक्षा पाच जून रोजी होणार होती. परीक्षेसाठी २१ मेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार होते. आता मात्र हा कालावधी वाढवून १० जूनपर्यंत करण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bC8U2s
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments