Also visit www.atgnews.com
GATE 2022: गेट परीक्षेची तयारी सुरू; IIT Kharagpur घेणार परीक्षा
Details: आयआयटी मुंबई (IIT Bombay) द्वारे ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग 2021 (GATE 2021) चे यशस्वीपणे आयोजन केल्यानंतर गेट 2022 (GATE 2022) ची तयारी सुरू झाली आहे. यावेळी परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी खडगपूर (IIT KGP) कडे आहे. आयआयटी मुंबईचे अध्यक्ष प्रा. सुभाशीष चौधरी यांनी आयआयटी खडगपूरचे अध्यक्ष वीरेंद्र कुमार तिवारी यांच्याकडे परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सुपूर्द केली आहे. ही परीक्षा इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी असणाऱ्या किंवा इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेद्वारे आयआयटीसह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये एमटेक अभ्यासक्रमांना प्रवेश (MTech Admission) मिळतो. याव्यतिरिक्त सरकारी संस्थादेखील गेट स्कोर (GATE Score) च्या आधारे नोकरी देतात. यावर्षी देखील मिळणार सवलत? गेट 2021 मध्ये आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना सवलत दिली होती. कोविड-१९ महामारीमुळे अनेक महाविद्यालयांमध्ये परीक्षा झाली नव्हती तर अनेक महाविद्यालयांचे निकाल जाहीर झाले नव्हते. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे गोंधळाचे वातावरण होते की त्यांना तृतीय वर्षाचे विद्यार्थी म्हणून ग्राह्य धरणार की चौथ्या वर्षाचे विद्यार्थी म्हणून ग्राह्य धरणार. त्यामुळे तृतीय वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील गेट परीक्षेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. जर यंदाही सद्यस्थितीत सुधारणा झाली नाही आणि परीक्षा-निकालाला विलंब झाला तर यंदादेखील ही सवलत दिली जाऊ शकते. गेट 2022 (GATE 2022) चे नोटिफिकेशन अद्याप जारी करण्यात आलेले नाही. या नोटिफिकेशनसह अॅप्लिकेशन डिटेल्स आणि परीक्षेची माहिती दिली जाईल. ही परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. गेट 2021 परीक्षेत 'ह्यूमॅनिटीज' (Humanities) या नव्या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पहिल्याच वेळी १४,१९६ विद्यार्थ्यांनी या विषयासाठी अर्ज केला होता. यापैकी ८,६३४ विद्यार्थीनी होत्या. गेट २०२१ मध्ये एकूण ८,८२,६८४ विद्यार्थी सहभागी झाले होते. हे प्रमाण 2020 पेक्षा अधिक होते, २०२० मध्ये ८.५९ लाख विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wHl5Df
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments