Also visit www.atgnews.com
LIC Vacancy 2021: एलआयसी एसोसिएट पदांवर भरती, वार्षिक ९ लाखांचे सॅलरी पॅकेज
Associate Recruitment 2021: भारत जीवन बीमा निगम (LIC) मध्ये नोकरीची संधी आहे. एलआयसीच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) विभागातील जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती असोसिएट पदांवर होणार आहे. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना वार्षिक ९ लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अॅप्लिकेशन फॉर्म आणि जॉब नोटिफिकेशनच्या लिंक्स पुढे देण्यात आल्या आहेत. पद का नाम - असोसिएट (Associate) पदों की संख्या - ६ सीटीसी (CTC) - ६ से ९ लाख रुपये तक वार्षिक अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची तारीख - २४ मे २०२१ अर्ज करण्याची अंतिम तारीख - ७ जून २०२१ अर्ज शुल्क - या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. पात्रता काय? ज्या उमेदवारांनी सोशल वर्क किंवा रूरल मॅनेजमेंटमध्ये किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, ते उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील. वयोमर्यादा १ जानेवारी २०२१ पर्यंत वय २३ ते ३० वर्षांच्या दरम्यान असायला हवे. कसा करायचा अर्ज? या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. एलआयसी एचएफएल () ची वेबसाइट lichousing.com द्वारे अर्ज करायचा आहे. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. निवड प्रक्रिया - ऑनलाइन चाचणी घेतली जाणार आहे. या टेस्टची मेरिट लिस्ट आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vttXMi
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments