MPSC पोलीस उपनिरीक्षक भरतीतील शारीरिक परीक्षेच्या निकषांमध्ये बदल

पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब या पदासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील सूचना राज्य लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर जारी केली आहे. हे सुधारित निकष २०२० च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू होणार आहेत. सुधारित मापदंड पुढीलप्रमाणे असतील - १) पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी शारीरिक चाचणीची गुण अर्हताकारी करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता / अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही. २) या सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांचे बेरीज अपुर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल. शारीरिक चाचणीचा तपशील पुढीलप्रमाणे - पुरुष उमेदवारांकरिता - गोळाफेक - वजन ७.२६० कि.ग्रॅ. - कमाल गुण - १५ पुलअप्स - कमाल गुण - २० लांब उडी - कमाल गुण - १५ धावणे (८०० मीटर) - कमाल गुण - ५० महिला उमेदवारांकरिता - गोळाफेक - वजन ४ कि.ग्रॅ. - कमाल गुण - २० धावणे (४०० मीटर) - कमाल गुण - ५० लांब उडी - कमाल गुण - ३० आयोगाने परिपत्रकात असे म्हटले आहे की, 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vkpL1F
via IFTTT

Post a Comment

0 Comments