Also visit www.atgnews.com
SBI फार्मसिस्ट आणि डेटा अॅनालिस्ट भरती परीक्षा लांबणीवर
स्टेट बँक ऑफ इंडियाने () फार्मसिस्ट आणि डेटा अॅनालिस्ट भरती परीक्षा लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा २३ मे २०२१ रोजी होणार होती. परीक्षेच्या सुधारित तारखा कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाहीर केल्या जातील. 'कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, २३ मे २०२१ रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत,' असे भारतीय स्टेट बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. यात पुढे असेही म्हटले आहे की या भरती जाहिरातीतील अन्य सर्व नियम आणि अटींमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या उमेदवारांनी SBI Pharmacist and Data Analyst Recruitment Examinations 2021 साठी अर्ज केले आहेत त्यांनी बँकेच्या परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3whSLqD
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments