शिक्षकांच्या लोकल प्रवासला मुख्यमंत्र्यांची नामंजुरी,दिले 'हे'कारण

Local Train for Teachers:दहावी, बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाचे काम सुरु आहे. अशावेळी शिक्षकांना शाळेत पोहोचण्यासाठी टॅक्सीचा पर्याय निवडावा लागतो. यासाठी हजार ते बाराशे रुपये खर्च होतात. हे टाळण्यासाठी शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा (mumbai local train travel update)द्यावी अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांनी केली होती. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट देखील घेण्यात आली. त्यांनी यासंदर्भातील आश्वासन देखील दिले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला नामंजुरी दिली आहे. राज्य सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे. शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने पर्यायी व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता काय करावे ? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या गटामध्ये लोकल प्रवासाची (mumbai local train travel update) परवानगी देण्यात आली आहे. मुंबई सध्या तिसऱ्या गटात आहे. त्यामुळे दुसऱ्या गटात येईपर्यंत शिक्षकांना लोकल प्रवास शक्य नसल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात यतो. सध्य परिस्थितीत मुंबईत करोना रुग्ण संख्या आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी कमी आहे. पण मुंबईला दुसऱ्या गटात टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला नाहीय. दरम्यान रेल्वे लोकलचे पास उपलब्ध नसल्यामुळे शिक्षकांना रोजचा हजार, बाराशे रुपयांचा भुर्दंड पडतो आहे. जर सरकार पास उपलब्ध करून देणार नसेल तर आम्ही दहावी, बारावीच्या निकालांवर बहिष्कार टाकू असा इशारा शिक्षक भारती संघटनेने दिला आहे. अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले आहे. दहावी, बारावी निकाल प्रक्रियेवर आम्ही बहिष्कार टाकत असल्याचे शिक्षक भारती संघटनेने जाहीर केले आहे. निकालास उशीर झाल्यास याला आम्ही जबाबदार नाही. त्याला सरकार जबाबदार असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vwjsHp
via IFTTT

Post a Comment

0 Comments