Also visit www.atgnews.com
उच्च शिक्षणात गेल्या पाच वर्षांत वाढले मुलींचे प्रमाण!
मुलींच्या उच्च शिक्षणाबाबत एक चांगली बातमी आहे. राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींचे प्रमाण भलेही कमी असेल, पण उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण गेल्या पाच-सहा वर्षात वाढले आहे. २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांत उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढले आहे. ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन (AISHE) 2019-20 हे सर्वेक्षण अलीकडेच जाहीर झाले. एम.फिल., पोस्ट ग्रॅज्युएट आणि सर्टिफिकेट लेव्हलच्या अभ्यासक्रमांसह मुली वैद्यकीय अभ्यासक्रम, बीए, बीएससी अभ्यासक्रमांमध्ये नैपुण्य मिळवत आहेत. मात्र व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे. मुलींचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ २७.३ टक्के आहे, तर मुलांचा २६.९ टक्के आहे. एम.ए., एम.एससी., एम.कॉम पर्यंतचं शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण गेल्या पाच वर्षात वाढले आहे. या अहवालानुसार, २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षात विद्यार्थ्यांच्या नोंदणीत ११.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या काळात महिलांची नोंदणी १८.२ टक्के इतकी सर्वाधिक आहे. या सर्वेक्षण अहवालानुसार, राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वात कमी २४.७ टक्के स्वायत्त विद्यापीठांमध्ये ३३.४ टक्के तर राज्यांतील खासगी विद्यापीठांमध्ये ३४.७ टक्के इतके आहे. राज्यांतील शासकीय विद्यापीठांमधील महिलांचे प्रमाण ५०.१ टक्के तर केंद्रीय विद्यापीठांमध्ये हे प्रमाण ४८.१ टक्के आहे. कला, विज्ञान, वाणिज्य शाखांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण वाढले आहे. मात्र बीटेक, बीई, एलएलबी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ते अजूनही कमी आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास बहुतांश राज्यांमध्ये मुलींच्या तुलनेत उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. याला अपवाद उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cCbmWZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments