Also visit www.atgnews.com
६ वर्षांची चिमुरडी गृहपाठाला कंटाळली, बोबड्या भाषेत पंतप्रधानांकडे केली तक्रार
Small Girl Complaint to : करोना प्रादुर्भावामुळे सुरु असलेले ऑनलाईन शिक्षण हे लहान मुलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. लहान मुले वर्षभरापासून आपल्या शाळेतल्या मित्रपरिवारापासून दूर आहेत. आपल्या घरुनच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. बराच वेळ ऑनलाईन क्लासला बसायचं आणि नंतर होमवर्क करायचं यामुळे लहान मुलांवरील ताण वाढलाय. यालाच कंटाळून एका चिमुरडीने थेट यांच्याकडे तक्रार केली आहे. ६ वर्षाची ही काश्मीरी मुलगी नेहमीच्या ऑनलाईन क्लासला खूपच कंटाळली आहे. अभ्यासाच्या वाढत्या ताणाबद्दल तिने एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियात खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओत ती म्हणते, माझे सकाळी १० वाजल्यापासून आणि दुपारी २ वाजेपर्यंत असतात. आधी इंग्रजी, गणित, उर्दू, ईव्हीएस आणि नंतर संगणकाचा क्लास असतो. सोशल मीडियात यूजर्सना हा क्यूट व्हिडिओ खूप आवडला आहे. तिची ही तक्रार थेट जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्नत यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर लहान मुलांच्या शिक्षणाचं ओझ कमी करण्यासाठी ४८ तासात धोरण बनवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी हा व्हिडीओ रिट्विट देखील केलाय. 'खूप अडॉरेबल तक्रार आहे. शाळेतल्या मुलांवरील शिक्षणाचे ओझे कमी करण्यासाठी होमवर्कचे ओझे कमी करण्यात येईल. यासाठी शालेय शिक्षण विभागाला ४८ तासांच्या आत धोरण बनविण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. लहानपण ही देवाची देणगी आहे. त्याचा आनंद घ्यायला हवा', असे ते म्हणाले. जम्मू-कश्मीरच्या 6 वर्षांच्या चिमुरडीचा तक्रारीचा व्हिडीओ औरंगजेब नक्शबंदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला. ६ वर्षांच्या काश्मिरी मुलीने ऑनलाईन क्लासेस आणि शाळेत मिळणाऱ्या होमवर्कबद्दलची चिंता व्यक्त केली आहे, असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले. 45 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये ची चिमुरडी म्हणते की तिचा ऑनलाईन क्लास १० वाजता सुरु होतो आणि दुपारी २ वाजता संपतो. इंग्रजी, गणित, उर्दू, ईव्हीएस आणि नंतर संगणकाचा वर्ग असतो. लहान मुलांवर याचे खूप ओझे आहे. रोज अशा तणावाला सामारे जावे लागते, असे तिने हाताने विनवणी करत सांगितले. लहान मुलांना इतकं काम का करावं लागतं ? असा भाबडा प्रश्न तिने उपस्थित केलाय.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i7mkHH
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments