राज्यातही CBSEफॉर्म्युला अवलंबणार,मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

Evaluation 2021:सीबीएसईने बारावी विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी ठरवलेला फॉर्म्यूला महाराष्ट्र शिक्षण विभाग देखील अवलंबणार आहे. यांनी तसे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आपला प्रस्तावर लवकर पाठवण्याचे निर्देश दिले. सीबीएसई बोर्डातर्फे विद्यार्थ्याचे मूल्यांकन करण्यासाठी त्याचे दहावी, अकरावी आणि बारावीतील बेस्ट तीन विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दहावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज, अकरावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज तर बारावीच्या गुणांसाठी ४० टक्के वेटेज दिले जाणार आहे. यासंदर्भात त्यांनी शिक्षण विभागाला विचार करण्यास सांगितले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची यासंदर्भात मुख्याध्यापकांसोबत बैठक झाली. यामध्ये बहुतांश हे सीबीएसई असेसमेंट फॉर्म्युलाच्या बाजूने होते. त्यामुळे आता शिक्षण विभाग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असा आहे सीबीएसई बारावी मूल्यांकन फॉर्म्युला - बारावी - यूनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री-बोर्ड परीक्षेतील कामगिरीच्या आधारे मिळणार गुण. या गुणांचे वेटेज ४० % असेल. अकरावी - अंतिम परीक्षेतील सर्व विषयांच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे ग्राह्य धरणार ३० % वेटेज. दहावी - प्रमुख पाच विषयांपैकी तीन विषयांच्या लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे मिळणार गुण. हे तीन विषय म्हणजे विद्यार्थ्याला सर्वाधिक गुण मिळालेले बेस्ट तीन विषय असतील. याचे वेटेजही ३० % असेल. यासाठी टर्म परीक्षांच्या पाच पैकी तीन विषयांचे गुण विचारात घेतले जातील. बारावीच्या मूल्यमापनासाठी युनिट, टर्म आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. निकाल तयार करण्यासाठी प्रत्येक शाळेत निकाल समिती स्थापन करण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्याला अनावश्यक वाढीव गुण मिळणार नाहीत, याची जबाबदारी या समितीवर असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d38C5g
via IFTTT

Post a Comment

0 Comments