देशात किती लवकर सुरु होणार शाळा? सरकारने दिले उत्तर

School Open: करोना प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊनचे पालन सुरु आहे. यामुळे राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील बंद आहेत. ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवला जातोय. दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्य मंडळाद्वारे बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. देशभरातील शिक्षक आणि पालक हे शाळा कधी सुरु होणार ? असा प्रश्न विचारत आहेत. देशातील करोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. शाळा कधी उघडणार ?या प्रश्नावर केंद्रातून उत्तर मिळाले आहे. सर्वाधिक शिक्षकांचे लसीकरण झाल्यानंतर शाळा उघडण्याबाबत विचार केला जाईल असे केंद्राने म्हटले आहे. शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी अनेक बाबींवर विचार होणे गरजेचे असल्याचे नीति आयोगचे सदस्य डॉ.वीके पॉल यांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेक देशांना शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. आम्हाला आमची मुलं, शिक्षकांना घाबरलेल्या स्थितीत ठेवायचे नाहीय. हा रोग नुकसान पोहोचवणार नाही याची खात्री पटायला हवी असे ते म्हणाले. जसे लसीकरणाची संख्या वाढतेय, शिक्षकांचे लसीकरण होईल, आपण आपल्या सवयी बदलू आणि रोजच्या कामात सोशल डिस्टन्स ठेवायला सुरु करु. एकवेळ अशी येईल जेव्हा शाळा पुन्हा सुरु होतील असे डॉ.पॉल म्हणाले. शाळा पुन्हा सुरु करणं हा मोठा निर्णय असल्याचेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SL6urZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments