यूजीसीच्या जॉब पोर्टलवर १ लाखाहून अधिक नेट/सेट, पीएचडी धारकांचा अर्ज

: पीएचडी, नेट/सेटधारकांना रोजगार मिळण्याच्या हेतून यूजीसीने नुकतेच सुरु केले. याला महाविद्यालय तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. एक लाखाहून अधिक पीएचडी, नेट, सेट परीक्षा क्वालिफाईड करणाऱ्यांनी यावर नोकरीसाठी अर्ज केलाय. पण आता नव्या जॉबसाठी 'नो' असे लिहून येत आहे. यूजीसीने आपल्या पोर्टलवर जॉब संदर्भात नियमित माहिती अपडेट केली तर जॉब पोर्टल अधिक उपयोगी येईल असे दिसत आहे. याआधी उमेदवारांना जॉबसाठी एम्प्लॉयमेंट पेपर, लोकल न्यूजपेपरवर अवलंबून राहावे लागत होते. पण आता पोर्टलमुळे त्यांना जॉबची थेट आणि अचूक माहिती मिळतेय असे दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरु पीसी जोशी यांनी सांगितले. तरीही डिजीटल माध्यम अजून सगळीकडे पोहोचले नसल्याने वर्तमानपत्रातील जाहीराती व इतर मार्गाचा वापर करुन नोकरीची माहिती पोहोचवा असे आवाहन यूजीसीने केले आहे. यूजीसी केवळ नोकरीची माहिती देऊ शकले पण नोकरी मिळण्याची जबाबदारी घेणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील उच्च शिक्षण संस्था अत्यंत कमी माणसांमध्ये काम करत आहे असे काकतीय विद्यापीठाचे प्रमुख टी यादगिरी राव यांनी सांगितले आहे. हे स्पष्ट करताना त्यांनी स्वत:चे उदाहरण दिले. २३ जणांची मान्यता मिळाली असताना आम्ही दोघे सर्व काम पाहत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जॉब पोर्टल तयार करण्यापेक्षा राज्य आणि केंद्रातील भरतीवर लक्ष द्यावे असे ते म्हणाले. जॉब पोर्टल नोकरी शोधण्यास त्रास होणार नाही. कारण यूजीसीने तरुणांसाठी विशेष जॉब पोर्टल तयार केले आहे. याअंतर्गत विद्यापीठात अनुदान समितीने पीएचडी, राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्य पात्रता परीक्षा (एसईटी)साठी जॉब पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर प्रोफाइल बनविल्यानंतर उमेदवारांना विविध कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये रिक्त जागांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. उमेदवार इथे अर्ज करु शकतात. यूजीसीतर्फे नव्या जॉबसोबत नॉन टीचिंग जॉब बद्दल माहिती दिली गेली आहे. नॉन टीचिंग जॉबमध्ये एडमिनसंबंधी कामे असतील. अकाऊंट्स, सिक्योरीटी, आरोग्य, अभ्यासिका अशा विभागात नोकरी मिळेल. याची माहिती जॉब पोर्टलवर अपलोड केली जाईल. याव्यतिरिक्त विद्यापीठ अनुदान आयोग(university Grants Commission UGC)यूजीसीने देशभरातील ३८ विद्यापीठांना ऑनलाईन डिग्री प्रोग्राम्ससाठी परवानगी दिली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर आता ही विद्यापीठं यूजीसीच्या परवानगीविना पूर्णवेळ ऑनलाईन कार्यक्रम सुरु करणार आहेत. या विद्यापीठांमध्ये १५ डीएम्ड विद्यापीठ, १३ राज्य विद्यापीठ आणि तीन केंद्रीय विद्यापीठ आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qupyai
via IFTTT

Post a Comment

0 Comments