दिल्ली सरकारकडून ९वी आणि ११ वीची परीक्षा रद्द, निकालाची दिली माहिती

Delhi 9th and 11th std Result :दिल्ली सरकारने ९वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी ९ वी आणि ११ वी परीक्षा रद्द झाल्याची घोषणा केली. ज्या खासगी शाळांनी आपली सहामाही आणि वार्षिक परीक्षा घेतली होती त्यांनी त्याआधारेच जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शाळांमध्ये सहामाही परीक्षा झाली होती आणि वार्षिक परीक्षा झाली नव्हती अशा सर्व सरकारी आणि खासगी शाळांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. अशावेळी शाळांनी सहामाही परीक्षेच्या आधारावर ९ वी आणि ११ वीच्या रिझल्टची घोषणा करण्यास सांगितले आहे. ज्या शाळांमध्ये सहामाही परीक्षा झाली नव्हती किंवा काही पेपर झाले होते, अशावेळी झालेल्या दोन विषयांच्या आधारे त्यांना पुढच्या वर्गात प्रमोट करावे असे सांगण्यात आले आहे. बाकी विषयांचे गुण देऊ गुणपत्रिका तयार केली जाणार आहे. रिझल्ट कधी ? दिल्ली सरकारतर्फे शाळांमध्ये ९ वी आणि अकरावीचा निकाल २२ जून रोजी घोषित केला जाईल. हे रिझल्ट शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल. कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत बोलावले जाणार नाही. काही विद्यार्थ्यांनी कोणतीच परीक्षा दिली नाही. किंवा असेदेखील विद्यार्थी आहेत जे सहामाही परीक्षेत नापास झाले आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांना आणखी एकवेळा परीक्षेची संधी देण्यात येईल. पण अशा विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाणार नाही. त्यांचा निकाल प्रोजेक्ट, असाईनमेंटद्वारे लागेल. हे शाळेच्या स्तरावरच होईल. यासाठी गाईडलाइन्स जाहीर केल्या आहेत. प्रवेशासाठी ११ ते ३० जून दरम्यान ऑनलाइन अर्ज करायचा आहे. १४ जुलैपर्यंत प्रवेशाची घोषणा केली जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zgVJOB
via IFTTT

Post a Comment

0 Comments