दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार चित्रकलेचे गुण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद दहावीतील चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण () मिळणार आहेत. करोनामुळे २०२०मध्ये इंटरमिजिएट परीक्षा न झाल्याने त्यावरून सवलतीचे गुण मिळणार की नाही, असा पेच निर्माण झाला होता. यावर अखेर सरकारने सवलतीचे गुण मिळतील, असे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीतील विद्यार्थी शासकीय रेखा कला परीक्षेत यशस्वी ठरला असेल, तर त्याला सवलतीचे गुण दिले जातात. सात, पाच व तीन असे गुण विद्यार्थ्यांना मिळतात. करोनामुळे कला संचालनालयाने २०२०मध्ये परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी मंडळाने शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या, तसेच लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले. या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी, इंटरमिजिएट दोन्ही परीक्षा पास झाले असतील तर सवलतीचे गुण मिळतात. अनेक शाळांनी इतर प्रस्ताव सादर केले, परंतु २०२०मध्ये परीक्षा न झाल्याने अनेक रेखा कला विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यावर सरकारने आदेश काढून, सवलतीचे गुण देण्याबाबत स्पष्ट केले. २०१९मध्ये झालेल्या एलिमेंटरी परीक्षेच्या आधारावर इंटरमिजिएटचे गुण निश्चित करून विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हा बदल केवळ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापुरताच असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. 'एटीडी' विद्यार्थ्यांनाही सूट सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय रेखाकला परीक्षा झाली नाही. त्यामुळे कला शिक्षण प्रशिक्षण पदविका (एटीडी) आणि मुलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन) या दोन अभ्यासक्रमांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून सूट देण्यात आली आहे. २०२०-२१ शैक्षणिक वर्षापुरतीच ही सवलत मर्यादित राहिल, सरकारने स्पष्ट केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cOnWTk
via IFTTT

Post a Comment

0 Comments