Medical Jobs:कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये भरती,परीक्षेची गरज नाही!

ESIC Medical Officer Notification, :जर तुमच्याकडे मेडिकलमध्ये मास्टर्स डिग्री आहे आणि तुम्ही मेडिकल जॉब शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही ESIC भरतीसाठी अर्ज करु शकता. (ईएसआयसी) पुणे यांना मेडिकल ऑफिसरची आवश्यकता आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन पाहू शकतात. या भरतीसाठी कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवार थेट वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतात. वॉक-इन-इंटरव्ह्यू ३० जून २०२१ ला होणार आहे. भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. भरतीची माहिती (ESIC Vacancy Details) ईएसआयसीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण ३५ मेडिकल ऑफिसर्सच्या जागा रिक्त आहेत. शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशननुसार कोणत्याही प्रमाणित विद्यापीठ किंवा संस्थेतून एमबीबीएस (M.B.B.S.) ची पदवी असलेले या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. या व्यतिरिक्त उमेदवारास मराठी भाषा आणि कॉम्प्यूटरची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. कुठे होणार वॉक-इन-इंटरव्ह्यू ? उमेदवारांची मुलाखत ऑफिस ऑफ एडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिस, तळ मजला, पंचदीप इमारत, एसआर, नंबर- ६८०९०0 बिबवेवाडी पुणे ४११०३७ या पत्त्यावर होणार आहे. उमेदवारांनी महत्वाच्या कागदपत्रांसह या पत्त्यावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. पगार महाराष्ट्र सरकारचा जीआर दिनांक २९ मे २०२० नुसार, कॉन्ट्रॅक्टच्या आधारे निवडल्या गेलेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xmgIxA
via IFTTT

Post a Comment

0 Comments