देशातील ३८ विद्यापीठात मिळेल ऑनलाइन डिग्री, यूजीसीने दिली परवानगी

run The Fulfillment : अनुदान आयोग समिती (university Grants Commission ) यूजीसीने देशभरातील ३८ विद्यापीठांना ऑनलाइन पदवी कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर आता विद्यापीठ यूजीसीच्या परवानगीविना पूर्णवेळ ऑनलाइन पदवी कार्यक्रम सुरु करु शकतात. यूजीसीने जाहीर केलेल्या यादीनुसार ऑनलाईन अभ्यासक्रम घेणाऱ्यांमध्ये १५ डीम्ड विद्यापीठ, १३ राज्य विद्यापीठ आणि तीन केंद्रीय विद्यापीठ आहेत. याव्यतिरिक्त ओपी जिंदल ग्लोबल विद्यापीठ, चंदीगडविद्यापीठ आणि मणिपाल विद्यापीठ सहित तीन खासगी विद्यापीठांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ, नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सिम्बॉसिस इंटरनॅशनल आणि भारती विद्यापीठ यांचा समावेश आहे. ही सर्व विद्यापीठ मिळून आतापर्यंत १७१ अभ्यासक्रमांना मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ११ संस्था आहेत. ज्यामध्ये ७२ अभ्यासक्रम आहेत. अशा प्रकारे सर्वात जास्त संस्था असेलेले तमिळनाडू हे एकमेव राज्य बनले आहे. जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) जैसे केंद्रीय विद्यापीठ ऑनलाइन माध्यमातून मास्टर ऑफ आर्ट्स (शिक्षण) आणि मास्टर ऑफ आर्ट्स (पब्लिक एडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रम शिकवू शकतात. याव्यतिरिक्त जवाहरलाल नेहरु विद्यापीठात संस्कृतमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स आणि मिजोरम विद्यापीठात चार प्रोग्राम सुरु होणार आहेत. जम्मू विद्यापीठ पूर्णपणे ऑनलाईन मोडमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स (इंग्रजी) आणि मास्टर ऑफ कॉमर्स ऑनलाईन कोर्सेसची सुरुवात करणार आहे. २०२०-२१ मध्ये ऑनलाईन प्रोग्राम्ससाठी इच्छुक असणाऱ्या विद्यापीठांना यूजीसीने प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. यूजीसीच्या नियमांनुसार एनएएसी किंवा एनआयआरएफ रॅंकिंग क्रायटेरियाचे पालन केल्यानंतरच त्यांना ही परवानगी मिळणार आहे. करोना प्रादुर्भावामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास यूजीसीने हे पाऊल उचलले आहे. एक सामान्य अभ्यासक्रम ४० टक्के ऑनलाइन शिकवण्यास परवानगी देण्यात आली होती. यासंदर्भात यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wqXoPN
via IFTTT

Post a Comment

0 Comments