CBSE 12th Board:रिझल्टसाठी ३०:३०:४०फॉर्मुला? कोणत्या विद्यार्थ्यास किती गुण मिळू शकतात? जाणून घ्या

Formula latest update:माध्यमिक शिक्षण बोर्ड(CBSE)ने बारावी बोर्ड रिझल्ट ( (CBSE 12th Board Result 2021) तयार करण्यासाठी फॉर्म्युला तयार केला आहे.. बोर्ड ड (CBSE Board)ने यासाठी ३०:३०:४० फॉर्म्युला स्वीकारला असल्याची माहिती समोर येत आहे. ने दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा (CBSE 10th, 12th Board Exam 2021) रद्द केली होती. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यानुसार सीबीएसईने (CBSE) रिझल्ट (CBSE 12th Board Result 2021) च्या फॉर्मुल्यानुसार दहावी रिझल्टवर ३० टक्के, अकरावी रिझल्टवर ३० टक्के आणि बारावी प्री बोर्ड रिझल्टला ४० टक्के वेटेज दिले जाणार आहे. अहवालानुसार, समितीतर्फे रिझल्ट (CBSE Board Result 2021) तयार करण्याचा हा फॉर्मुला १७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडणार आहे. यानंतर हा फॉर्मुला सार्वजनिक केला जाईल. १ जूनला सीबीएसईने बारावी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. करोनामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षावर वाईट परिणाम झाला. अनेक शाळांमध्ये फिजिकल क्लासेस झाले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन योग्य पद्धतीने होत नाही. अशावेळी समिती ३०:३०:४० फॉर्म्युला अंमलात आणत आहे. यामध्ये अंतर्गत गुण ग्राह्य धरले गेले नाहीत. १८ जूनला निर्णय १ जून २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी एका उच्चस्तरीय बैठकीनंतर बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. 'खूप विचार केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. त्यांच्या आरोग्य आणि भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे' पंतप्रधान म्हणाले. वैकल्पिक मूल्यांकन प्रक्रियेवर निर्णय घेण्यासाठी १३ सदस्यीय समिती सोमवारी (१४ जून) आपला अहवाल देणार होती. त्यानंतर १६ जून ही तारीख देखील सांगण्यात येत होती. पण आता १८ जून या तारखेवर शिक्कामोर्तब झाले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TExvxd
via IFTTT

Post a Comment

0 Comments