CBSE 12th Marking Scheme:सीबीएसई बारावी मुल्यांकन अपडेट जाणून घ्या, 'या' आधारे देणार गुण

class 12 evaluation: बारावीचे कसे दिले जाणार ? रिझल्टचे मुल्यांकन कोणत्या आधारे केले जाणार? यासंदर्भात बोर्डाची बैठक झाली आहे. लवकरच याची माहिती जाहीर केली जाणार आहे. बारावी बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यानंतर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहे. रिजल्ट कसे बनणार? सीबीएसई बारावी बोर्ड विद्यार्थ्यांचे मुल्यांकन कसे आहे? केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड(CBSE)च्या १२ सदस्यांची एक्सपर्ट निर्णयापर्यंत पोहोचली आहे. बारावी निकालासाठी रिझल्टच्या मुल्यांकनासाठी दहावी पर्यंतचे निकाल विचारात घेतले जाणार आहेत. याची संपूर्ण अपडेट जाणून घ्या. शिक्षण मंत्रालय (Education Ministry) च्या सूत्रांनुसार, सीबीएसई रिझल्ट एक्सपर्ट कमेटी दहावी, अकरावी आणि बारावी या तीन वर्गांच्या परफॉर्मन्सना बारावी बोर्ड परीक्षा २०२१ (CBSE 12th evaluation 2021) आधार बनवण्यावर विचार करत आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना दहावी बोर्डमध्ये त्यांचा परफॉर्मन्स अकरावीची फायनल परीक्षा आणि बारावी प्री बोर्ड परीक्षेतील परफॉर्मन्सच्या आधारे दिले जातील. हा प्रस्ताव लागू झाला तर या वर्षी सीबीएसई बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन १)दहावी बोर्ड परीक्षा, २) अकरावी अंतिम परीक्षा आणि ३)बारावी बोर्ड परीक्षा या तीन चाचणींच्या आधारे होईल. पण या कंपोनेंटला काय वेटेज (किती गुण) दिले जाणार यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. थिअरीचे एकूण ७० गुण असणार आहेत. केंद्र सरकारने १ जूनला सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सीबीएसईला क्लास १२ मार्किंग स्कीम आणि इव्हॅल्युएशन प्रोसेसची डिटेल सबमिट करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला. दोन-दिवसांच्या आत सीबीएसई बोर्ड(CBSE Board) मार्किंग पॅटर्नची माहिती कोर्टाला दिली जाईल. इव्हॅल्यूएशन पॅटर्नची संपूर्ण माहिती बोर्डचे संकेतस्थळ cbse.nic.in वर देखील देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vnPyVA
via IFTTT

Post a Comment

0 Comments