Also visit www.atgnews.com
CBSE, ICSE बारावी परीक्षांसदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी २२ जूनला
on CBSE, ICSE 12th Evaluation 2021: सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षांसंबंधी दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान सोमवारी खंडपीठाने सांगितले की दोन्ही बोर्डांचे निकष एकसमान असावेत आणि निकालाची घोषणाही एकाचवेळी व्हावी. न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. दोन्ही बोर्डांनी सादर केलेल्या मूल्यांकन निकषांचा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकार केला होता आणि काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवले होते. दुसरीकडे, सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली केली. यासह विविध राज्यांतील बारावीच्या बोर्ड परीक्षांसंबधीदेखील सुनावणी घेतली. विविध राज्यांच्या महाधिवक्त्यांनी आपापल्या राज्यातील बोर्ड परीक्षांच्या स्थितीविषयी खंडपीठाला माहिती दिली. यासंबंधीची पुढील सुनावणी मंगळवारी २२ जून रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी २१ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सीबीएसई आणि सीआयसीएसई या केंद्रीय बोर्डांच्या बारावीच्या रद्द परीक्षांच्या मूल्यांकनाच्या निकषांवर सुनावणी घेतली. सोमवारीच सर्वोच्च न्यायालयाद्वारे सीबीएसई आणि सीआईएससीई इव्हॅल्युएशन क्रायटेरिया वर अंतिम निर्णय देईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यापूर्वीची सुनावणी १७ जून २०२१ रोजी झाली होती. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाने सोमवारी सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षांवर देखील सुनावणी घेतली. ११५२ विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीएसई बोर्ड नियमितपणे विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई आणि इतर शिक्षण मंडळाद्वारे घेतलेले मूल्यांकन पद्धतीनुसार बारावीच्या खासगी / कम्पार्टमेंट / रिपीटर्स विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वेळेत जाहीर करावे, अशी मागणी याचिकार्त्यांनी केली आहे. १७ जून रोजी झाली होती सुनावणी बोर्डाने १७ जूनला आपला फॉर्मुला कोर्टाला दिला. जो कोर्टाने मंजूर करुन आपल्या रेकॉर्डवर घेतला. केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालात खंडपीठासमोर सीबीएसई बोर्डाच्या दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन पद्धतीचे निकष सादर केले. यानुसार, विद्यार्थ्याचे मूल्यांकन करण्यासाठी त्याचे दहावी, अकरावी आणि बारावीतील बेस्ट तीन विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दहावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज, अकरावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज तर बारावीच्या गुणांसाठी ४० टक्के वेटेज दिले जाणार आहे. यासाठी टर्म परीक्षांच्या पाच पैकी तीन विषयांचे गुण विचारात घेतले जातील. बारावीच्या मूल्यमापनासाठी युनिट, टर्म आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gIO2JA
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments