CBSE, ISCE 12th std Exam cancelled: नेटीझन्सकडून मिम्स शेअर करत आनंद व्यक्त

share funny memes on : सीबीएसई बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द ( Cancelled 12std Exam)होणार असल्याचा निर्णय काल (मंगळवार, १ जून) जाहीर झाला. 'करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सध्याचा परिस्थितीत अशा प्रकारच्या परीक्षांमुळे तरुणांना धोका निर्माण होऊ शकतो असेही ते म्हणाले. सीबीएसई (CBSE), आयएससीई ( ) बोर्डाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. तसेच निर्णयानंतर सोशल मीडियात आनंद व्यक्त होताना दिसतोय. तरुणांनी वेगवेगळे मिम्स तयार केले आहेत. याखाली मजेशीर कमेंट येऊ लागल्या आहेत. तसेच एकमेकांना टॅग देखील केलं जात आहे. इंटरनेटवर व्हायरल असणाऱ्या मजेशीर फोटोंवर परीक्षांसदर्भातील कॅप्शन लिहली जात आहे. बारावीची परीक्षा रद्द केल्याच्या घोषणेनंतर सीबीएसई बोर्डातून बारावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. देशातील करोना परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. एप्रिलच्या मध्यापासून विद्यार्थी या निर्णयाची वाट पाहत होते. आयएससीई बोर्डाने देखील बारावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकष लवकरच जाहीर केले जाईल असे आयएससीई बोर्डाकडून सांगण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pbl0VR
via IFTTT

Post a Comment

0 Comments