CBSE Result: सीबीएसईच्या 'या' परीक्षांचा निकाल जाहीर

Recruitment Result: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विविध भरती परीक्षांच्या निकालांची (Recruitment Exams) घोषणा केली आहे. सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in च्या रिक्रूटमेंट पेज वर निकालाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. निकाल पाहण्याची थेट लिंक या वृत्तातही देण्यात आली आहे. हे निकाल सीबीएसई ज्युनियर असिस्टंट, सीनियर असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांचे आहेत. या परीक्षा २०१९ मध्ये निघालेल्या एकूण ३५७ रिक्त जागांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा २०२० मध्ये झाली होती. सीबीएसईने सीनियर असिस्टंट पदांवरील भरतीसाठी ३० जानेवारी २०२० रोजी परीक्षेचे आयोजन केले होते. स्टेनोग्राफरसाठी भरती परीक्षा ३१ जानेवारी २०२० रोजी झाली होती. ज्युनिअर असिस्टंट साठी भरती परीक्षा २९ आणि ३० जानेवारी २०२० रोजी घेण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vGsfHL
via IFTTT

Post a Comment

0 Comments