बारावीच्या परीक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्वाची बैठक

: बारावी परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे. सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दोन दिवसांत निर्णय घेऊन तो गुरुवारी न्यायालयासमोर ठेवण्याचे निर्देश दिले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना कोरोनाची लक्षणे उद्भवल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले. पोखरियाल हे आज महत्वाची मिटींग घेणार होते. त्यानंतर बारावी परीक्षेच्या निर्णयाचं काय होणार ? असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारावी परीक्षेसंदर्भात महत्वाची बैठक बोलावली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावी परीक्षेसंदर्भातील निर्णय ३ जून (गुरुवार) पर्यंत अपेक्षित आहे. बारावी परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. आणि बोर्डाने परीक्षा घेण्यासंदर्भातील योग्य कारण सांगा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. बोर्ड परीक्षा रद्द करु शकेल का ? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संध्याकाळी बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पर्यायासंदर्भात माहिती दिली जाईल. सीबीएसई बारावी परीक्षेसंदर्भातील अंतिम निर्णय बोर्ड आणि केंद्र सरकार ३ जूनपर्यंत सादर करणार आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. परीक्षा रद्द होणार आहेत की नाही ? परीक्षा होणार असल्यास त्याचे नियोजन कसे असेल ? या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल हे आज यासंदर्भात महत्वाची घोषणा करण्याची शक्यता होती. पण त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wJt96r
via IFTTT

Post a Comment

0 Comments