Also visit www.atgnews.com
CBSE:बारावी मूल्यमापन पद्धतीवर आज निर्णय होणार?
12th Class 2021 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) बारावी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची पद्धत १४ जून रोजी जाहीर होऊ शकते. सीबीएसई बारावीची २०२१ च्या आधारावर देशभरातील विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक वर्षासाठी लागू असेल. म्हणून देशभरातील सीबीएसई बारावीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सीबीएसई मूल्यांकन पद्धत २०२१ नुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांसाठी गुण दिले जाणार आहेत. बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर सीबीएसई विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना पर्यायी पद्धत अवलंबण्यासाठी १३ सदस्यीय समिती बनवण्यात आली. या समितीने दहा दिवसात आपला अहवाल सादर केल्याची माहिती दिली. अंदाजे १२ लाख विद्यार्थी प्रतिक्षेत सीबीएसई बोर्ड बारावीच्या मूल्यमापन पद्धतीची प्रतिक्षा देशातील साधारण १२ लाख विद्यार्थ्यांना आहे. परीक्षा न देता अंतर्गत परीक्षांच्या आधारे निकाल जाहीर केले जाणार अशी घोषणा करण्यात आली. तेव्हापासून विद्यार्थी आपल्या निकाल्याच्या प्रतिक्षेत आहेत. काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना आपली युनिट टेस्ट आणि सहामाही परीक्षेत चांगले गुण मिळाले नाहीत. पण त्यांनी बोर्ड परीक्षेसाठी चांगली तयारी केली होती. आता अंतर्गत मुल्यमापनाने निकाल लागणार असल्याने ते नाराज आहेत. दरम्यान, जे विद्यार्थी या निकालावर खूष नसतील अशा विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई बोर्ड नंतर परीक्षेचे आयोजन करणार आहे. सीबीएसईने मूल्यमापन पद्धत २०२१ द्वारे निकाल जाहीर केल्याची घोषणा केल्यानंतर अनेक राज्यांच्या बोर्डांनी बारावी निकाल जाहीर करण्याची घोषणा केली आहे. देशातील दिल्ली विद्यापीठासहित उच्च शिक्षण देणाऱ्यांनी विद्यापीठ कोर्ससच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातात. विना परीक्षा अंतर्गत मूल्यमापनाच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे ही परीक्षा होणार ? की प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाणार ? यावर स्पष्टता येणे बाकी आहे. सध्या तरी सर्वजण सीबीएसई बोर्ड बारावी मूल्यमापन पद्धत २०२१ ची वाट पाहत आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cEfqWY
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments