Also visit www.atgnews.com
ICSI CS June 2021 Exam:सीएस परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
ICSI CS June 2021 :इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI)सीए परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. यानंतर आता इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI)ने सीएस परीक्षांसदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. जून २०२१ च्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ४ मेच्या अधिसूचनेनुसार सीएस जूनची परीक्षा स्थगित करण्यात आली. पण आता परिषदने फाउंडेशन प्रोग्राम, एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशनल प्रोग्राम्ससाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. फाउंडेशन प्रोग्राम, एक्झिक्यूटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवीन पाठ्यक्रम) आणि प्रोफेशनल प्रोग्राम (जुन्या आणि नवीन पाठ्यक्रम) साठी सीएसएस परीक्षा आता १० ऑगस्ट २०२१ ते २० ऑगस्ट २०२१ पर्यंत केली जाणार असल्याची घोषणा ICSIने केली. परीक्षेबद्दलची माहिती अधिकृत संकेतस्थळ icsi.edu वर उपलब्ध आहे. सीएस फाउंडेशन प्रोग्रामची परीक्षा १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्राम्ससाठी १० ते २० ऑगस्टला होणार आहे. आयसीएसआय फाउंडेशन परीक्षा सकाळी आणि दुपारी दोन शिफ्टमध्ये होणार आहेत. प्रोफेशनल आणि एग्झिक्युटिव्ह प्रोग्राम्ससाठी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. याआधी फाउंडेशन प्रोग्राम, एग्झिक्युटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) आणि प्रोफेशनल प्रोग्राम (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) ची परीक्षा १ जून ते १० जून २०२१ पर्यंत होणार होती. पण आता या परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ShCwM2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments