Also visit www.atgnews.com
IGNOU Admission 2021: इग्नू प्रोग्राम्स कोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू,अशी करा नोंदणी
Admission 2021:ओपन किंवा डिस्टन्समधून शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटी(IGNOU)ने जुलै २०२१ च्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया (IGNOU July 2021) सुरु केली आहे. तुमच्या आवडीचे कोर्स पाहण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. १५ जुलै ही नोंदणीची शेवटची तारीख आहे. इग्नूमध्ये प्रवेश घ्यायचाय अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रोग्राम्स कोर्सेसचे पर्याय आहेत. डिफरंट ओपन, डिस्टन्स लर्निंग (ODL) आणि ऑनलाईन प्रोग्रामिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.oumarad.edu.in वर जायला हवे. पहिल्यांदाच प्रवेश घेणाऱ्यांसाठी जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या टॅबवर क्लिक करा. ज्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते निवडा. पात्रता निकष, शुल्काचा तपशील, कोर्सच्या अवधी हा सर्व तपशील वाचा. याव्यतिरिक्त, इग्नू कॉमन प्रॉस्पेक्टस आणि विद्यापीठातील नियम (कलम १०) वाचा. इग्नू कॉमन प्रॉस्पेक्टसची थेट लिंक खाली दिलेली आहे. असा करा अर्ज इग्नूची अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in जा. होमपेजवर 'NEW 'या लिंकवर क्लिक करा. नवे पेज खुले होईल. इथे मागितलेली डिटेल्स भरुन स्वत:ला रजिस्टर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. उमेदवाराचे युझरनेम रजिस्टर्ड ई-मेल आयडी येईल. त्याच्या मदतीने लॉग इन करा. या डॉक्युमेंट्सची आवश्यकता स्कॅन केलेले पासपोर्ट साइझ फोटो (१०० केबी) स्कॅन केलेली सही (१०० केबी) वय प्रमाणित स्कॅन प्रति (२०० केबी) संबंधित एजुकेशन क्वालिफिकेशन डॉक्यूमेंट्सची स्कॅन कॉपी (२०० केबी) अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करुन जात वैधता प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (लागू होत असल्यास) बीपीएल प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (२०० केबी) असणे गरजेचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xdB2RK
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments