Also visit www.atgnews.com
यूपीएससी एनडीए II नोटिफिकेशन 2021: ४०० रिक्त जागा, २९ जूनपर्यंत करा अर्ज
2 Notification 2021: संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) नॅशनल डिफेंस एकेडमी (NDA)आणि नेवल एकेडमी (NA)परीक्षा (2), २०२१ साठी आज जाहीर केले आहे. यूपीएससीने या वर्षात ४०० पदांसाठी नोटिफिकेशन काढले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. जे परीक्षेला उपस्थित राहू इच्छित नाहीत अशा उमेदवारांसाठी आयोगाने अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया उपलब्ध केली आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. २९ जून २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in नुसार, एनडीए आणि एनएए परीक्षेचे आयोजन ५ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. सप्टेंबरमध्ये होणारी परीक्षा यावर्षीची दुसरी परीक्षा आहे. यूपीएससी, एनडीए, एन 2 परीक्षा दरवर्षी एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाते, पण यंदा करोना महामारीमुळे (COVID19) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वर्षी दोन वेळा नव्हे तर केवळ एकदात ही परीक्षा होणार आहे. आर्मी विंगसाठी बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. एअरफोर्स आणि नवल विंगसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषयांसह बारावी पास असणे गरजेचे आहे. नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौसेना अकादमी(NA) मध्ये प्रवेश करण्यापूर्वी लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षा संघ लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केली जाते. यामध्ये पास झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाद्वारे मुलाखतीचे आयोजन केले जाते. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in वर जा. त्यानंतर, होमपेज असलेल्या संघ लोकसेवा आयोगााच्या विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्जाच्या लिंकवर क्लिक करु शकता. आता एक नवीन पेज उघडेल. इथे सर्व नोकऱ्यांच्या नोंदणीची लिंक सापडेल. इथून तुम्ही अर्जाची प्रक्रिया पूर्ण करु शकाल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/353ovEE
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments