IISER Admission 2021:बीएस-एमएस प्रवेशासाठी 'या' दिवशी होणार कल चाचणी

Admission 2021:इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (IISER)ने २०२१ साठी एप्टिट्यूड टेस्टची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यासंबंधी संस्थेने आपली अधिकृत वेबसाइट iiseradmission.in नोटीस जाहीर केली आहे. करोनाची स्थिती पाहता IISER (IAT)चे आयोजन १७ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात येणार आहे. KVPY आणि SCB स्ट्रीमच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी १ जुलै २०२१ ला एप्लिकेशन पोर्टल खुले केले जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. IIT-JEE च्या निकालानंतर अर्जासाठी पोर्टल खुले केले जाईल. यावर्षीच्या आयएसईआर प्रवेशासाठी जनरल उमेदवारला प्लस 2 स्तर आणि कमीत कमी ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. तर अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी (नॉन क्रीमी) साठी प्लस 2 लेवल वर ५५ टक्के गुण निर्धारित केले गेले आहेत. शिशु, बोर्डच्या परीक्षांचे निकाल आयएटीवेळळी उपलब्ध होणार नाहीत. त्यांना देखील परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाईल. करोनामुळे बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट पाहणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट iiseradmission.in वर जावे लागेल. यानंतर होमपेजवर आलेल्या अप्लाय नाऊ लिंकवर क्लिक करावे. तुम्ही नव्या पेजवर याल. इथे आधी तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर आपल्याला लॉगइन क्रेडेंशियलच्या माध्यमातून लॉगइन करुन आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करु शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vMA7a1
via IFTTT

Post a Comment

0 Comments