International Yoga Day:योग दिनाचे रोचक तथ्य जाणून घ्या!

International 2021:आंतरराष्ट्रीय जून २०१५ पासून साजरा केला जातोय. याची सुरुवात भारतातून झाली आणि आज जगभरात हा साजरा केला जातो. आपल्या देशात आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी नवीन थीम असते. पण यावर्षी करोनामुळे काळजी घेण्यात येत आहे. यंदाच्या थीममध्ये तुम्ही ऑनलाइन सहभाग नोंदवू शकता. आंतरराष्ट्रीय योग दिवसाची तथ्य आपण जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा अर्थ योग दिवस हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. हा एक शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक अभ्यास आहे. याची सुरुवात भारतातून झाली. योग हा शब्द संस्कृत भाषेतून येतो. योग आपल्या शरीराचा मनाशी मेळ घालून देतो. विशेषत: इंद्रियांवर नियंत्रण आणतो. योग दिवस दरवर्षी २१ जूनला साजरा केला जातो. हा जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारताकडे २ वर्ल्ड रेकॉर्ड भारतामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस हा राजपथ (Rajpath)वर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ८४ देशांच्या महत्वाच्या व्यक्तींनी साजरा केला. त्यांनी २१ योगासनांमध्ये भाग घेत संकल्पनेला प्रोत्साहन दिले. या आयोजनात भारताचे २ वर्ल्ड रेकॉर्ड झाले. हा जगातील सर्वाधिक संख्येचा योगावर्ग ठरला. यात ३५ हजार ९८५ जण सहभागी झाले होते. तसेच ८४ देशातील लोकांचा सहभाग असणारा दुसरा रेकॉर्ड ठरला. यावर्षीची थीम करोनापासून वाचण्यासाठी सकारात्मक राहणे आणि इम्यूनिटी वाढवणे गरजेचे आहे. हीच थीम योग दिवस २०२१ साजरा करताना ठेवण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिकृत वेबसाइटवर आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१ ची माहिती देण्यात आली आहे. मानव तंदुरुस्ती आणि कल्याणासाठी योग अशी थीमची कल्पना आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेत एखादा विषय गेल्यानंतर त्याच्यावर जगभरातून सल्ला आणि त्यावर चर्चा होण्यात अनेक दिवस जातात. पण २०१४ मध्ये पहिल्यांदाच योग दिवसाचा संयुक्त राष्ट्र संघात ९० दिवसांच्या आत कार्यान्वित झाला. संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झाले. १९८३ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये विश्व धर्म संसदेत आपल्या भाषणात पाश्चिमात्य देशांना योग विषयाची ओळख करुन दिली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qbDLce
via IFTTT

Post a Comment

0 Comments