ISCE Result 2021:बारावीच्या निकालाची २० जुलैला घोषणा? जाणून घ्या अपडेट

:इंडियन स्कूल सर्टिफिकेट्स एक्झामिनेशन (ISCE) तर्फे बारावीच्या आयएससी रिझल्टची घोषणा २० जुलै २०२१ पर्यंत होण्याची शक्यता आहे.आयएससी रिझल्ट २०२१ संदर्भात सुत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार माध्यमांध्ये यावरील वृत्त आले आहे. आयएससी बोर्ड परीक्षांचे निकाल जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. आयएससी बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करताना अकरावीचे इंटर्नल मार्क्स देखील जोडले जाऊ शकतात. आयएससी रिझल्ट संदर्भात कोणती अधिकृत घोषणा झाली नाही. दरम्यान विद्यार्थी अधिकृत वेबसाईट cisce.org वर वेळोवेळी भेट देऊ माहिती मिळवू शकतात. करोना प्रादुर्भावामुळे आयएससी परीक्षा रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बारावी निकालासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काऊंसिलतर्फे मूल्यमापन पद्धतीवर दाखल केलेली एक जनहित याचिका आज समोर आणली जाऊ शकते. १ जून २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी एका उच्चस्तरीय बैठकीनंतर बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. 'खूप विचार केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. त्यांच्या आरोग्य आणि भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे' पंतप्रधान म्हणाले. वैकल्पिक मूल्यांकन प्रक्रियेवर निर्णय घेण्यासाठी १३ सदस्यीय समिती सोमवारी (१४ जून) आपला अहवाल देणार होती. त्यानंतर १६ जून ही तारीख देखील सांगण्यात येत होती. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zvRBuf
via IFTTT

Post a Comment

0 Comments