CBSE 12th Result:प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित विद्यार्थ्यांना गुण कसे? बोर्डाने दिले निर्देश

Result Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (Central Board of Secondary Education) ने बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. नोटीसनुसार, सीबीएसईने सर्व संलग्न सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि प्रमुखांना निर्देश दिले आहेत की, प्रात्यक्षिक परीक्षा, प्रोजेक्ट आणि अंतर्गत मूल्यांकन विद्यार्थ्यांच्या मूळ शाळांनी करावयाचे आहे, जेथे त्या विद्यार्थ्यांची एलओसी जमा केली जाईल. या व्यतिरिक्त शाळांना लवकरच एक ऑनलाइन लिंक दिली जाईल. या लिंकद्वारे शाळा विद्यार्थ्यांचे स्टेट्स अनुपस्थित, COVID किंवा ट्रान्सफर अशा स्वरुपात रिमार्क देऊन विद्यार्थ्यांचे गुण नोंदवतील. यापूर्वी देखील सीबीएसई बोर्डाने शाळांना सांगितले आहे की त्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रॅक्टिकल वर्क आणि अंतर्गत मूल्यमापन केवळ ऑनलाइन माध्यमातून भरतील. २८ जूनपर्यंत शाळांनी हे गुण जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांना पाठवलेल्या पत्रात सीबीएसईने म्हटले होते की काही शाळा कोविड महामारीमुळे विविध विषयांचे प्रॅक्टिकल वर्क आणि इंटरनल असेसमेंट शाळांमध्ये प्रलंबित आहे. शाळांना केवळ ऑनलाइन माध्यमातूनच हे काम पूर्ण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळांनी २८ जून पर्यंत दिलेल्या लिंकवर गुण अपलोड करायचे आहेत. बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी १७ जून रोजी सुनावणी होणार आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे केले जाणार याबाबतही यावेळी कोर्ट निर्देश देऊ शकते. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ztedeZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments