Also visit www.atgnews.com
ITBP Constable GD Bharti: सरकारी नोकरी; आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती
ITBP Constable GD 2021: आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती २०२१ च्या तयारीला लागलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. भारत तिबेट सीमा पोलीस बल (आयटीबीपी) ने विविध खेळांसाठी असलेल्या क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांवरील भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. आयटीबीपी द्वारे जारी कॉन्स्टेबल जीडी भरती अधिसूचनेनुसार १२ विविध क्रीडाप्रकारांमध्ये एकूण ६५ पदांसाठी कॉन्स्टेबल जीडी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही सर्व पदे ग्रुप सी संबंधित आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना नंतर स्थायी नियुक्ती देखील दिली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया आणि तारीख आयटीबीपी जीडी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑफिशियल भरती पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. आयटीबीपीचे अधिकृत पोर्टल recruitment.itbpolice.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया ५ जुलै २०२१ रोजी दुपारी वाजल्यापासून सुरू होणार आहे. उमेदवार २ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करू शकतील. उमेदवारांनी याकडे ध्यान द्यावे की ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाही. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी आधी अॅप्लिकेशन पेज वर आणि अधिसूचनेत दिलेले निर्देश काळजीपूर्वक वाचावेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Thw9sC
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments