JNU ABVSME admissions 2021:जेएनयूमध्ये एमबीए करण्यासाठी अधिसूचना जाहीर

JNU ABVSME admissions 2021:अटल बिहारी वायपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि इंटरप्रेन्योरशिप, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने (Atal Bihari Vajpayee School of Management and Entrepreneurship, ABVSME, Jawaharlal Nehru University) पूर्णवेळ एमबीएसाठी जाहीर केले आहे. अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील पूर्ण माहिती मिळू शकणार आहे. जेएनयूने जाहीर केलेल्या सूचनेनुसार ABVSME ने दोन वर्षाच्या पूर्णवेळ (२०२१-२३) साठी अधिसूचना नुकतीच जाहीर केली होती. २०१९ साली हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला होता. यावर्षी २०२१ मध्ये पहिली ग्रॅज्युएट बॅच तयार आहे. तरुणांना सशक्त बनवणे, मॅनेजमेंट आणि उद्योजक क्षमता विकसित करणे हा ABVSME हे उद्देश आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसंदर्भात कुलगुरु एम जगदीश कुमार यांनी नुकतीच सूचना जाहीर केली होती. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेणं सुरक्षित असेल तेव्हाच ती घेतली जाईल असे यात म्हटले होते. सध्याची करोनाची परिस्थिती सुधारल्यावर प्रवेश परीक्षा घेतली जाईल. विद्यापीठ आपले शैक्षणिक वेळापत्रक त्यानुसार ठरवेल असेही त्यांनी म्हटले. यामध्ये त्यांनी सीबीएसई परीक्षेंसदंर्भात आपले मत मांडले. करोना परिस्थितीत बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य होता असे कुलगुरु एम जगदीश कुमार म्हणाले. करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सीबीएसईनंतर अनेक राज्यांनी आपल्या परीक्षा रद्द केल्या होत्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pX73Lj
via IFTTT

Post a Comment

0 Comments