Join Indian Air Force: बारावीनंतर वायुदलात यायचंय? मग 'हे' जाणून घ्या

Join : भारतीय वायुदल हे आयएएफ म्हणून देखील ओळखले जाते. ही एक प्रतिष्ठेची नोकरी मानली जाते. बारावीनंतर तुम्ही भारतीय वायुदलात जाऊ इच्छित असाल तर अनेल लेव्हलच्या परीक्षा असतात. इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीचे दोन भाग असून हे एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप यामध्ये विभागले आहेत. याशिवाय एनडीएच्या माध्यमातून देखील वायुदलात भरती होता येतं. वायुलात नोकरी मिळवण्याचे मार्ग सांगणार आहोत. एक्स ग्रुपसाठी पात्रता एक्स ग्रुप: एक्स ग्रुप इंडियन एयर फोर्सचा टेक्निकल ग्रुप आहे. यासाठी तुम्हाला १०+२ असे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. यामध्ये गणित, फिजिक्स आणि इंग्रजी विषयांसह ५० टक्के असणे गरजेचे आहे. किंवा ३ वर्षाचा पॉलिटीकल डिप्लोमा सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही अर्ज करु शकता. १०+२ पास आणि शिकणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करु शकतात. शारीरिक पात्रता उंची -१५२.५ सेंटीमीटर छाती -फूगवून ५ सेंटीमीटर वजन - ५५ किलोपेक्षा कमी नको अभ्यासक्रम (Syllabus Of IAF Exam) परीक्षा वेळ - ६० मिनिटे विषय-इंग्लिश, फिजिक्स आणि गणित सीबीएसई १०+२ लेवल वाय ग्रुप पात्रता वाय ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी १०+२ मध्ये ५० टक्के गुण किंवा शिक्षण सुरु. इंग्रजी विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक. याशिवाय तुमच्याकडे २ वर्षांची वॅकेशनल डिग्री असणे गरजेचे आहे. या कोर्समध्ये किमान ५० टक्के असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता (Physical Ability For Indian Air Force) उंची -१५२.५ सेंटीमीटर छाती - फूगवून ५ सेंटीमीटर वजन - ५५ किलोपेक्षा कमी नको परीक्षा वेळ - ४५ मिनिटे विषय - मातृभाषा, इंग्रजी आणि जीए एनडीएतून एअर फोर्स (Air Force Through NDA Exam) NDA: नॅशनल डिफेंस अॅकेडमी (NDA) च्या माध्यमातून येणारे टॉप लेव्हलटचे अधिकारी बनतात. यासाठी १०+२ मध्ये पास होणे गरजेचे आहे. विज्ञान विषयात फिजिक्स आणि मॅथ्स असे दोन्ही विषय असणे गरजेचे आहे. यामध्ये किमान ६० टक्के गुण असायला हवेत. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा होते. यूपीएससी अंतर्गत ही परीक्षा घेतली जाते. शिक्षण (Qualification For NDA Exam) १०+२ मध्ये विज्ञान शाखेत फिजिक्स आणि मॅथ्ससह ६० टक्के गुण शिकणारे विद्यार्थी देखील परीक्षा देऊ शकतात उमेदवार अविवाहित असणे गरजेचे अर्ज करण्यासाठी कमीतकमी १६.५ आणि अधिक १९.५ वर्षे वय असावे फिजिकल टेस्ट-मानसिक आणि शारीरिक स्वास्थ चांगले असणे गरजेचे आहे. उंचीनुसार वय असणे गरजेचे आहे. परीक्षा पॅटर्न यामध्ये मॅथ्स आणि जनरल एबिलिटी असे दोन पेपर आहेत. परीक्षा ९०० गुणांची आहे. यामध्ये हिंदी किंवा इंग्रजीपैकी एक भाषा निवडून परीक्षा देऊ शकता. दोन्ही विषयासाठी अडीच तास असतात. चुकीचे उत्तर दिल्यास निगेटीव्ह मार्कींग असेल. एक तृतीयांश गुण कापले जातील. मॅथ्ससाठी ३०० गुण आणि जनरल एबिलिटीसाठी ६०० गुण असतात. दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर एसएसबीद्वारे मुलाखतीसाठी बोलावले जाते. एनडीएमध्ये एकूण २७० प्रश्न विचारले जातात. यामध्ये १२० प्रश्न गणिताचे तर १५० प्रश्न जनरल एबिलिटीचे असतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35QfG1d
via IFTTT

Post a Comment

0 Comments